... हा तर झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न!

By admin | Published: December 9, 2015 01:08 AM2015-12-09T01:08:11+5:302015-12-09T01:08:11+5:30

कांदिवली येथे लागलेली आग म्हणजे झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी केला असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे,

Trying to grab this slum! | ... हा तर झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न!

... हा तर झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न!

Next

मुंबई : कांदिवली येथे लागलेली आग म्हणजे झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी केला असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे, तर या आगीमागे घातपात असल्याची शक्यता स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी वर्तविली असून, वनविभागाने झोपडीधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात आग कशी लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वनविभागाने आपली हद्द निश्चित न करता, २००० साली येथील पक्की घरे सरसकट जमिनदोस्त केली होती. कांदिवलीच्या भीमनगर येथील ३६ एकर जागा वनविभागाच्या अखत्यारित येत नाही. याच जागेवर भीमनगर झोपडपट्टी वसली, परंतु २००० साली तत्कालीन वनविभागाच्या जमिनीचा सर्वे न करता. वनसंचालकांनी फक्त घराचा सर्वे करून १९७२ पासूनची पक्की घरे तोडली. हा मुद्दा अंगलट येण्याची चिन्हे असल्यानेच वनविभागाने दिवाळीच्या आधी घाईगडबडीने झोपडीधारकांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर थोड्याच अवधीत अग्निकांडांची घटना घडली असून, यामागे स्थानिकांना पळवून लावण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या आगीमागे वनविभागाचे जागा ताब्यात घेण्याचे कारस्थान आहे. १५ वर्षांपासून किरकोळ कारणामुळे आणि पुराव्याचे कारण सांगून, अपात्र ठरविणाऱ्या वनविभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी व माहिती अधिकार कार्यकर्ते सुधाकर हिवाळे यांनी केली. पीडितांचे त्याच जागी पुनर्वसन करा
दामूनगर झोपडपट्टी येथील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या, तसेच या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून पुनर्वसन करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मंगळवारी सकाळी अहिर यांनी दामूनगर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या पीडितांना पक्षाच्या वतीने दोन
हजार ब्लँकेटसचे वाटप करण्यात आले, तसेच येत्या दोन दिवसांत आवश्यक भांडी, चटया आणि इतर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात
येणार आहे. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर सरकारच्या वतीने अपेक्षित असलेली मदत होत नसल्याचे सांगत, पीडितांना सरकारने शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Trying to grab this slum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.