Join us

कोरोनानंतर क्षयरोग रुग्णांत पुन्हा वाढ; २०२१ मध्ये दोन लाख ६२३ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:27 AM

कोरोना आणि क्षयरोग (टी.बी.) यासारख्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जवळपास सारखी असल्याने  क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आजारांच्या रुग्णसंख्येतही घट होत आहे. कोरोना आणि क्षयरोग (टी.बी.) यासारख्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जवळपास सारखी असल्याने  क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली आहे. कोरोनानंतर नाॅन कोविड सेवा पूर्ववत होत असताना राज्यातील क्षयरुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. राज्यात २०१९ मध्ये दोन लाख २७ हजार ४ क्षयरुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर २०२० मध्ये यात कमालीची घट झाली. तर राज्यात २०२० मध्ये एक लाख ६०  हजार ७२ क्षयरुग्णांची नोंद झाली. त्यानंतर २०२१ मध्ये राज्यात दोन लाख ६२३ क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे हळूहळू नाॅन कोविड सेवा पूर्ववत होत असल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, रुग्णांच्या मनातील रुग्णालयात जाण्याची मानसिकता बदलत असल्याने रुग्णसंख्याही सुरळीत होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. देशात २०१९ मध्ये सुमारे २६ लाख क्षयरोगरुग्णांचे नव्याने निदान झाले होते. साथीच्या काळात निदानावर परिणाम झाल्यामुळे यात सुमारे ४१ टक्क्यांनी घट झाली आणि या काळात १८ लाख रुग्णांचे निदान झाले. राज्यातही हेच चित्र कायम असून २०१९ मध्ये सुमारे २ लाख १७ हजार क्षयरोगाचे रुग्ण नव्याने आढळले होते, तर कोरोना साथीमध्ये हे प्रमाण १ लाख ६० हजारांपर्यंत घसरले. २०२१ मध्येही दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील क्षयरोग रुग्णांच्या निदानाचे प्रमाण ४१ टक्क्यांनी घटले. गेल्यावर्षीपेक्षा जास्त क्षयरोगी शोधून काढण्यात यशस्वी झालो ही बाब अभिमानास्पद असली, तरी चिंता वाढविणारी आहे. कारण कोणत्याही आजारापेक्षा सर्वात जास्त आर्थिक हानी ही क्षयरोगामुळे होते.   धोरणात्मक निर्णय वेळेत घेतल्यामुळे व टीमवर्क चांगले असल्यामुळे हे काम शक्य झाले. क्षयरुग्ण शोधून त्यांना तत्काळ औषधोपचार देणे आवश्यक आहे. - डॉ. रामजी आडकेकर, सहसंचालक आरोग्य विभागरुग्णांमध्ये वाढवर्ष    क्षयरोग रुग्ण२०१९    ६१३७३२०२०    ४३४००२०२१    ५९०५४या कारणामुळे झाली होती निदानात घट कोरोनाच्या चाचण्यांसाठी सीबीएनएएटी (जेनएक्स्पर्ट आणि ट्रूनॅट) या निदान तंत्राचा वापर.कोरोनाच्या कामासाठी मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर.सामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणाबद्दल भीती.खासगी रुग्णालये, दवाखाने लॉकडाऊनमुळे बंद होते.