मुंबई: केंद्र सरकारच्या परवानगीविना परदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतल्याप्रकरणी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी सामजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती आनंद यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. त्यावरचा निर्णय विशेष सीबीआय न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत राखून ठेवला.गुजरातमधील सामाजिक कार्यामुळेच आपल्याला या गुन्ह्यात अडकवले गेले आहे. आपण निर्दोष आहोत. तेव्हा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी सेटलवाड व त्यांच्या पतीने अर्जात केली आहे. मात्र सेटलवाड यांच्या संस्थेने केंद्र सरकारचे नियम डावलून निधी घेतला आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सीबीआयने केला. (प्रतिनिधी)
तिस्ता यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी निर्णय
By admin | Published: July 18, 2015 4:03 AM