तुकाराम मुंढेंचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले; पशुपालन नव्हे, पशू उद्योजक संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 09:14 AM2024-10-12T09:14:53+5:302024-10-12T09:15:34+5:30

राज्याच्या सकल उत्पन्नात पडणार भर

tukaram mundhe animal husbandry policy accepted as it is | तुकाराम मुंढेंचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले; पशुपालन नव्हे, पशू उद्योजक संकल्पना

तुकाराम मुंढेंचे पशुसंवर्धन धोरण आहे तसे स्वीकारले; पशुपालन नव्हे, पशू उद्योजक संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले.  राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत   कुठलाही बदल न करता ते मंजूर करण्यात आले. 

मुंढे यांच्या वारंवार बदल्या केल्या जातात आणि त्यावर चर्चादेखील होत असते, पण पशुसंवर्धन विभागात अल्पकाळ असतानाही त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासात आमूलाग्र बदल सुचविणारे धोरण तयार केले. विभागाची केवळ पुनर्रचनाच न करता दूध उत्पादक, पशुपालकांची समृद्धी कशी होईल, यावर फोकस करत हे धोरण त्यांनी बनविले. 

- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून दोन्ही विभाग एकत्र करणार. त्यामुळे प्रशासन प्रभावी बनेल. 

- विभागाचे नाव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग असे असेल.  

- पशु व पशुजन्य उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.  राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर पडेल. 

- पशुपालनाऐवजी पशू उद्योजकता ही संकल्पना विकसित करणार. 

- विभागात १५,५५२ इतकी पदे असतील. ७,२५६ पदे नव्याने भरणार. 

- ३५१ तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयांची निर्मिती

- ३१७ तालुक्यांमध्ये  तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जातील.

- पशुसंवर्धन, दुग्धविकासाशी संबंधित सर्व विषय (उत्पादन ते विक्री) एका छताखाली आणाणार 

- दुध उत्पादकांच्या उत्पादनांची विक्री करणारी प्रभावी यंत्रणा तयार करणार. पशुंच्या आरोग्याची काळजी या विषयावर फोकस. 

- कालबाह्य झालेली बरीच पदे रद्द करणार, काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेली कौशल्यपदे निर्माण करणार.  

- पशुंवरील उपचारासाठी तालुका पातळीपर्यंत अत्याधुनिक यंत्रणा बसविणार.दूध उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाययोजना. दूध उत्पादनात जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण केली जाईल.

 

Web Title: tukaram mundhe animal husbandry policy accepted as it is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.