तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:14 PM2021-01-13T20:14:19+5:302021-01-13T20:14:56+5:30

Tukaram Mundhe News : २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती.

Tukaram Mundhe finally got the posting, now he will be in charge of this department | तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

googlenewsNext

मुंबई - धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून कुठलीही जबाबदारी न मिळालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना अखेर आज पोस्टिंग मिळाली आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यामुळे ते पदभाराविना होते. दरम्यान, आज राज्य सरकारने त्यांची यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या अन्य नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची सहकार, मार्केटिंग आणि वस्त्रोद्योग विभाहाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच उदय जाधव यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामध्ये सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title: Tukaram Mundhe finally got the posting, now he will be in charge of this department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.