मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:31 AM2019-07-13T00:31:11+5:302019-07-13T00:31:36+5:30
तलावांमध्ये ४३ टक्के जलसाठा; पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाण्यासाठी गेले काही महिने वणवण करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४३.९२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीइतकाच हा जलसाठा असून, तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे.
१२ जुलै रोजी सकाळपर्यंत तलावांमध्ये एकूण सहा लाख ३५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला सहा लाख ३६ हजार तर २०१७ मध्ये सात लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला होता. मुंबईला दररोज १८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरून वाहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी २४ तासांमध्ये तलावांत तब्बल ८८ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला होता. गेल्या तीन-चार दिवसांत पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Chief Public Relations Officer (CPRO): One of Mumbai's sources of water supply, lake Tulsi started overflowing, today. (File pic) pic.twitter.com/1i2NkpY99x
— ANI (@ANI) July 12, 2019
जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६०.६१
तानसा १२८.६३ ११८.८७ १२६.०७
विहार ८०.१२ ७३.९२ ७७.६७
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.१०
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९४.०३
भातसा १४२.०७ १०४.९० १२३.३६
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २७२.६०ी आणखी आठ लाख ११ हजार जलसाठ्याची गरज आहे.