Join us

टर्नर, फिटरचा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 4:25 PM

झूम व सिस्को एप्लिकेशनच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आयटीआयचे लेक्चर्स

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व १४ एप्रिलपर्यंतच्या देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन व इ प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरु ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत झूम व सिस्को एप्लिकेशनच्या माध्यमातून व्हिडीओ कन्फरन्सिंगद्वारे निदेशक तासिका घेत असून यासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. एकूणच या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इ लर्निंग सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यंचे प्रशिक्षण पूर्ण करावे अशा सूचना संचलनालयाकडून देण्यात आल्या आहेत.संचालनालयाच्या संकेतस्थळावर वर्कशॉप कॅल्क्युलेशन, वर्कशॉप सायन्स , इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स, इम्प्लॉयबिलिटी स्किल्स, फिटर , टर्नर या विषयांचे इ कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षक या कन्टेंटच्या सहाय्याने तासिका घेऊ शकणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊ शकतात आणि त्यांची चाचणीही घेऊ शकणार आहेत.या मोड्युलचे प्रशिक्षण या आधीच शिक्षकांना देण्यात आले असल्याने शिक्षकांना या मोड्युलद्वारे प्रशिक्षण देण्याच्या सूचना संचालनालयामार्फत करण्यात आल्या आहेत. संचालनालयाच्या युट्युब चॅनेलवर आतापर्यंत १२७ लेक्चर्स अपलोड करण्यात आले असून त्यामधूनही विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. यासंबंधित सूचना विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे ही पाठविण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांसोबतच राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संचालनालयामार्फत अधिकृत इ मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अधिकृत ई मेल आयडी चाय माध्यमातून प्रशिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लेक्चर्स घेऊ शकणार आहेत. यासाठी ते झूम व सिस्कोसारख्या प्रणालीचा वापर करू शकणार आहेत. याचसोबत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स ,देणे  चाचणी परीक्षा आयोजित करणे , भू पर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे परीक्षा घेणे , माहितीची देवाण घेवाण करणे हे नियोजन सहज करत असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक योगेश पाटील यांनी दिली.दररोज २ तास प्रशिक्षण आवश्यकराज्यातील सर्व आय्द्योगिक प्रशिक्षण संस्थांनी दररोज किमान २ तास या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे अनिवार्य असून त्याचा अहवाल सायंकाळी ७ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे देणे आवश्यक असल्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात बेस्ट प्रॅक्टिसेस अवगत करणे , प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे नुकसान टाळणे यासाठी संचालकांमार्फत एक दिवसाआड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली जात आहे.

टॅग्स :शिक्षणकोरोना सकारात्मक बातम्यामुंबई