भाडेतत्त्वावरील घरांची उलाढाल वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:04 AM2020-12-23T04:04:47+5:302020-12-23T04:04:47+5:30

मासिक भाड्यात मात्र वाढ नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संक्रमणामुळे आलेली आर्थिक मंदी आणि सुरक्षित व ...

Turnover of rented houses increased | भाडेतत्त्वावरील घरांची उलाढाल वाढली

भाडेतत्त्वावरील घरांची उलाढाल वाढली

Next

मासिक भाड्यात मात्र वाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संक्रमणामुळे आलेली आर्थिक मंदी आणि सुरक्षित व मोठ्या घरांची निर्माण झालेली गरजेमुळे मुंबईतील भाडेतत्त्वावरील घरांची उलाढाल वाढली. आर्थिक अरिष्ट आल्यामुळे अनेकांनी जास्त भाडे असलेली घरे सोडून कमी भाडे असलेल्या घरांमध्ये स्थलांतर सुरू केले, तर कोरोना काळात ज्यांना आपली घरे असुरक्षित आणि अपुरी वाटत होती, ते सुरक्षित निवाऱ्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. यामुळे या व्यवहारांची उलाढाल वाढली असली, तरी प्रत्यक्षात घर भाड्याची रक्कम मात्र ५ ते १० टक्क्यांनी कमी झाल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

कोरोना संक्रमणाच्या पहिल्या तीन महिन्यांत घरांच्या आणि व्यावसायिक जागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास बंद होते. मात्र, सप्टेंबरपासून त्यात तेजी आली. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत भाडे तत्त्वावरील घरांचे ७६,५३९ व्यवहार मुंबईत नोंदविले गेले. यंदा २० डिसेंबरपर्यंत त्यांची संख्या ८१,३०५ इतकी आहे. गेल्या वर्षी दररोज होणाऱ्या सरासरी व्यवहारांची संख्या ८०५ होती. ती यंदा १,०१६ पर्यंत वाढली. डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ हजार जास्त व्यवहार नोंदविले जातील, अशी चिन्हे आहेत.

कोरोना संकटामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बहुतांश लोकांचे वेतन कमी झाले. व्यावसायिकांची आवकही घटली. त्यामुळे भाडेतत्त्वावरील मोठी घरे सोडून कमी आकाराच्या घरांमध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले. याशिवाय अनेक छोटी घरे या काळात अडचणीची ठरली. वर्क फ्राॅम होम, मुलांच्या ऑनलाइन शाळांसाठी जागा अपुरी पडत असल्याने मोठी घरे घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्यवहार वाढताना दिसतात, परंतु घर भाडेतत्त्वावर देताना पूर्वीएवढे भाडे देण्यास कुणी तयार होत नाही. त्यामुळे मालकांना कमी दरात तडजोड करावी लागत असल्याची माहिती एका रिअल इस्टेट ब्रोकर कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

* मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंद झालेले भाडे करार

महिना २०१९ २०२०

सप्टेंबर१६,६७९१९,६१०

ऑक्टोबर२१,०१२२१,०१२

नोव्हेंबर१८,८४२१८,८४२

डिसेंबर२०,००६१८,६४० (२० तारखेपर्यंत)

एकूण ७६,५३९८१,३०५

----------------------------------------

Web Title: Turnover of rented houses increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.