राज्यात वर्षभरात रस्ते अपघातात साडेबारा हजार नागरिकांचा मृत्यू ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:06 AM2021-02-24T04:06:54+5:302021-02-24T04:06:54+5:30

जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील रस्त्यावरील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये गतवर्षात मोठी घट ...

Twelve and a half thousand people died in road accidents in the state during the year. | राज्यात वर्षभरात रस्ते अपघातात साडेबारा हजार नागरिकांचा मृत्यू ।

राज्यात वर्षभरात रस्ते अपघातात साडेबारा हजार नागरिकांचा मृत्यू ।

Next

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील रस्त्यावरील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये गतवर्षात मोठी घट झाली आहे. सरत्या वर्षात २४ हजार ९७१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ११ हजार ५६९ जण ठार झाले आहेत.

२०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षीच्या अपघातात तब्बल २४ टक्के घट झाली आहे. अर्थात त्याला प्रमुख कारण हे कोरोनामुळे लागू असलेली संचारबदी आणि निर्बंध होते.

राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत २४ हजार ९७१ अपघात झाले, त्यामध्ये एकूण ११ हजार ५६९ जण ठार झाले आहेत. २०१९ मध्ये त्याचे प्रमाण अनुक्रमे ३२,९२५ व १२,७८८ इतके होते. पूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्षातील अपघातांमध्ये एकूण २४ टक्के, तर त्यात मृत्यू होण्याच्या प्रमाणात १० टक्के घट झाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षी २३ मार्च ते ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू होती. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध लागू होते. त्यामुळे रस्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी असल्याने आपसूकच अपघाताचे प्रमाणही कमी राहिले.

राज्यात १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण १ लाख २९ हजार ६६३ अपघात झाले आहेत. त्यामध्ये एकूण ५० हजार १२९ जण मृत्युमुखी पडले.

(उद्याच्या अंकात : एन एच-६ बनतोय मृत्यूचा सापळा)

-----------------

चार वर्षांतील राज्यातील अपघात आणि मृत्यूची आकडेवारी

वर्ष अपघात मृत्यू

२०१७ ३६,०५६ १२,५११

२०१८ ३५,७११ १३,२६१

२०१९ ३२,९२५ १२,७८८

२०२० ११,५६९ २४,९७१

एकूण- १,२९६६३ ५०,१२९

---------------------------

कोरोना महामारीमुळे कर्फ्यू लागू असल्याने गेल्या वर्षात वाहतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, अपघाताचे प्रमाण टाळणे आणि जखमींना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध उपाय राबविले जात असल्याने त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय (अपर महासंचालक, राज्य महामार्ग वाहतूक विभाग)

Web Title: Twelve and a half thousand people died in road accidents in the state during the year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.