सात वर्षाच्या मुलाला बारा तासांचे काम; चिमुकल्या हातांवर मोठा भार, बॅग कारखान्यातून १३ मुलांची सुटका

By मनीषा म्हात्रे | Published: August 28, 2023 08:00 PM2023-08-28T20:00:42+5:302023-08-28T20:00:54+5:30

माझगाव येथील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून ७ ते १६ वयोगटातील १३ मुलांची सुटका करण्यात आली आहे.

Twelve hours of work for a seven-year-old boy 13 children rescued from bag factory | सात वर्षाच्या मुलाला बारा तासांचे काम; चिमुकल्या हातांवर मोठा भार, बॅग कारखान्यातून १३ मुलांची सुटका

सात वर्षाच्या मुलाला बारा तासांचे काम; चिमुकल्या हातांवर मोठा भार, बॅग कारखान्यातून १३ मुलांची सुटका

googlenewsNext

मुंबई: माझगाव येथील दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून ७ ते १६ वयोगटातील १३ मुलांची सुटका करण्यात आली आहे. मुलांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांचे मानसिक, शारीरिक छळ करत जास्तीचे अंगमेहनतीची कामे करून घेण्यात येत होती. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत कारखाना मालकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७ वर्षाचा मुलगाही पोलिसांच्या हाती लागला.

त्यांच्याकडून १० ते १२ तास काम सरकारी कामगार अधिकारी भरत शेर्लेकर (५४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. विशेष बाल पोलीस कक्षातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच, सरकारी कामगार अधिकारी आणि संस्थेच्या प्रतिनिधींसह त्यांनी या कारखान्यात छापा टाकला. यावेळी अल्पवयीन मुले बॅगेचे काम करताना दिसून आले. कमी मोबदल्यात या मुलांकडून जास्तीचे कामे करून घेतली जात होती. यामध्ये एक ७ वर्षाचा मुलगाही पोलिसांच्या हाती लागला. 

बिहारमधून या मुलांना कामासाठी येथे आणले होते. या मुलांकडून १० ते १२ तास काम करून घेतले जात होते. अनेकांचा नकार असतानाही बळजबरीने त्यांच्याकडून कामे करून घेण्यात येत होती. मुलांना वेळेवर जेवणही मिळत नव्हते. मुलांना क्रूरपणे वागणूक देत कामावर ठेवल्याप्रकरणी कारखाना मालक गौस मोहम्मद फराज मेहबूब अन्सारी (२६) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या मुलांना बाल सुधारगृहात रवानगी करत त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Twelve hours of work for a seven-year-old boy 13 children rescued from bag factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई