जुळ्यांचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ जोरात...नव्या वर्षात सहा नवजात 'सेम टू सेम, जन्मदर लागला वाढीस

By स्नेहा मोरे | Published: January 22, 2023 06:33 AM2023-01-22T06:33:43+5:302023-01-22T06:34:15+5:30

आपल्या मातृभाषेत जुळ्यांवरून म्हणी प्रचलित आहेत. दोन भाऊ वा बहिणी यांच्यापैकी एकाला काही लागलं खुपलं की दुसराही तसेच करणार,

Twins Six newborns same to same in the new year birth rate increased | जुळ्यांचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ जोरात...नव्या वर्षात सहा नवजात 'सेम टू सेम, जन्मदर लागला वाढीस

जुळ्यांचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ जोरात...नव्या वर्षात सहा नवजात 'सेम टू सेम, जन्मदर लागला वाढीस

Next

मुंबई :

आपल्या मातृभाषेत जुळ्यांवरून म्हणी प्रचलित आहेत. दोन भाऊ वा बहिणी यांच्यापैकी एकाला काही लागलं खुपलं की दुसराही तसेच करणार, या प्रकाराला जुळ्याचं दुखणं असे म्हटले जाते. एकूणच जुळी मुले होणे हा दुर्मीळ प्रकार असल्याने त्याचे अप्रूप अधिक. मात्र, काही वर्षांत जुळी मुले होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या २० दिवसांत कामा रुग्णालयात झालेल्या ८५ प्रसूतींपैकी सहा प्रसूतींत जुळ्यांचा जन्म झाल्याची नोंद आहे. कामा हे महिलांसाठी समर्पित शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी एकूण ३ हजार ३७५ अर्भके जन्माला आली. त्यातील ६० प्रसूती जुळ्या बाळांच्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हजार बाळांमागे चार जुळे
गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जुळ्या बाळांचा जन्मदर वाढत असल्याचे निरीक्षण आहे.
गेल्या दोन दशकांपासून जुळ्या मुलांच्या जन्मामध्ये दहापट वाढ झाली आहे.
जवळपास ३० ते ५० टक्के जुळी गर्भधारणा ही वंध्यत्व उपचारांमुळे होते, असे तज्ज्ञ म्हणतात.

उशिराने गर्भधारणा आणि गर्भधारणेसाठी आयव्हीएफसारख्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यामुळे १९८० सालापासून जुळी अपत्ये जन्माला येण्याचे प्रमाण आहे 'ह्युमन रिप्रॉडक्शन' या विषयावर आंतरराष्ट्रीय संशोधन अहवालातील माहितीनुसार, ३० वर्षात जगभरात जुळ्यांचा जन्मदर वाढला आहे. आशियात जुळ्यांचा जन्मदर ३२ टक्क्यांनी वाढला आहे. जुळ्यांच्या जन्मासाठी वेगवेगळी कारणे असतात. मात्र, मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय,

जुळ्या मुलांचे प्रमाण वाढत असून, गेल्या काही वर्षात जुळ्या मुलांचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. या पूर्वीच्या काळात
७० पैकी एका घरात जुळ्या मुलांचा जन्म व्हायचा. मात्र, वंध्यत्व निवारण आणि त्याच्यावरील उपचारांमुळे आता हे प्रमाण १०-१२ टक्क्यांनी वाढत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
 

Web Title: Twins Six newborns same to same in the new year birth rate increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.