‘ती’च्यासाठी ट्विटरही एक पाऊल पुढे !

By admin | Published: March 8, 2017 04:27 AM2017-03-08T04:27:30+5:302017-03-08T04:27:30+5:30

महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभरात नारीशक्तीच्या कर्तृत्त्वाला सलाम केला जातो आहे. त्यात सध्या ‘कनेक्टींग’ माध्यम असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही

Twitter is a step ahead for 'She'! | ‘ती’च्यासाठी ट्विटरही एक पाऊल पुढे !

‘ती’च्यासाठी ट्विटरही एक पाऊल पुढे !

Next

मुंबई : महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभरात नारीशक्तीच्या कर्तृत्त्वाला सलाम केला जातो आहे. त्यात सध्या ‘कनेक्टींग’ माध्यम असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही यंदा आदिशक्तीचे कार्य चौफेर गुंजणार आहे. ट्विटरने या दिनाच्या निमित्ताने खास इमोजी लाँच केल्या असून नेटिझन्सला आपल्या आयुष्यातील ‘ती’चे स्थान अधोरेखित करण्यासाठी नवे हॅशटॅगही लाँच केले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिन आगळ््या वेगळ््या पद्धतीने साजरा करण्यासाठी टिष्ट्वटरने ‘वूमन्सडे’, ‘आयडब्ल्यूडी’ ‘इंटरनॅशनल वूमन्सडे’, ‘शीइन्स्पायरमी’ आणि ‘शीलीड्स इंडिया’ हॅशटॅग लाँच केले आहेत. त्याचप्रमाणे वैमानिक, पोलीस, नृत्यांगना, शेफ, नोकरदार अशा भूमिकेतील रंगीत इमोजी लाँच केले आहेत. हे इमोजी नेटिझन्सना १ एप्रिलपर्यंत वापरता येतील.
गेल्या वर्षभरात जगभरातून महिलांविषयक विषयांना वाचा फोडणाऱ्या हॅशटॅग चर्चेत राहिले. त्यातून टिष्ट्वटर इंडियाने प्रेरणा घेऊन महिला दिन विशेष इमोजी आणि हॅशटॅग लाँच केले आहेत. भारतातून ‘आयविलगोआऊट’ हा महिला संरक्षण विषयक हॅशटॅगला खूप प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे कॅनडातील ‘अ‍ॅक्शनमॅटर’, अमेरिकेतील ‘वायवूमनडोन्टरिपोर्ट’, ‘स्टॉपट्रान्समर्डर’, ‘वीजस्टनीडटूपी’ आणि इंडोनेशियातील महिलांविषयक समस्या आणि प्रश्न टिष्ट्वटरवर मांडले. केवळ महिलांचे प्रश्नच नव्हे तर त्यांचे अनुभव, आव्हाने आणि यशस्वी कहाण्याही सर्वांसमोर उलगडण्यासाठी जगभरातील महिलांनी टिष्ट्वटरच्या व्यासपीठाचा वापर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Twitter is a step ahead for 'She'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.