घरफोडीतील दोन आरोपींना अटक
By admin | Published: November 19, 2014 10:56 PM2014-11-19T22:56:55+5:302014-11-19T22:56:55+5:30
पारनाकामधील हरीओम गॅलरीचा दरवाजा कटरने फोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घरफोडीत चोरीस गेला होता. त्यात रोख रक्कम व मोबाइल यांचा समावेश होता.
रेवदंडा : पारनाकामधील हरीओम गॅलरीचा दरवाजा कटरने फोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घरफोडीत चोरीस गेला होता. त्यात रोख रक्कम व मोबाइल यांचा समावेश होता. ही घटना १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संयोग म्हात्रे (२० रा. गडबल ता. रोहा) हा मोबाइल चोरी केलेले विकतो, अशी गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी (१८) रोजी सकाळीच आरोपी सत्तार कासकर (वय २३) रा. सावरोली - चोरडे ता. मुरुड व संयोग यांना ताब्यात घेतले. या दोघांनी दुचाकीवरुन रेवदंड्यात येऊन दुकान फोडून वरील ऐवज चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी ३० हजार रुपयांचे मोबाइल, चोरीत वापरलेले ३५ हजार रुपयांची मोटारसायकल व सात हजार ५०० रुपये रोख असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करुन दोघा आरोपींना अटक केली आहे.
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी स्वत: हा तपास केला. त्यात पोलीस हवालदार संजय जगताप, भाग्यवान कांबळे, पोलीस नाईक महेश लांगी, सचिन खैरनार यांनी सहकार्य केले.
मागील काही महिन्यातील घरफोड्या उघडकीस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले
आहे. (वार्ताहर)