लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ माेहीम, मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर अशा नियमांचे पालन मुंबईकर करत आहेत. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईतील काेराेनाचे रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी आता सरासरी २५० दिवसांपेक्षा अधिक झाला आहे.
महापालिकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २४ विभागांपैकी तब्बल २१ विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २०० दिवसांपेक्षा जास्त आहे. तर २१ विभागांपैकी ४ विभागांत ४०० पेक्षा अधिक, ५ विभागांत ३०० पेक्षा अधिक तर १२ विभागांत २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुपटीचा कालावधी असून, यात भायखळा पहिल्या स्थानावर आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता ०.२७ टक्के खाली आला आहे. यातही २४ विभागांपैकी १४ विभागांत रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२७ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
देशातील इतर शहरे, राज्ये एवढेच नव्हे तर इतर देशांनीही काेराेनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईचे ‘मॉडेल’ स्वीकारले आहे.
n रुग्ण दुप्पट होण्याचा जास्त कालावधी असलेले ५ विभाग : भायखळा ४८२ दिवस, परळ ४६६ दिवस, मरिन लाइन्स ४४४ दिवस, दादर ४२८ दिवस, सँडहर्स्ट रोड ३९२ दिवस.n सर्वात कमी कालावधी बोरीवली २०९ दिवस, अंधेरी (पश्चिम) २०० दिवस, वांद्रे १९१ दिवस, गोरेगाव १७९ दिवस, कांदिवली १७४ दिवस.
दिलासादायक चित्र१०० दिवस : २० ऑक्टोबर१२६ दिवस : २४ ऑक्टोबर१५० दिवस : २९ ऑक्टोबर२०८ दिवस : ५ नोव्हेंबर२५५ दिवस : १४ नोव्हेंबर