लॉकडाऊन ते अनलॉक नैराश्यात अडीचपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:22 AM2020-06-11T02:22:30+5:302020-06-11T02:22:37+5:30

देशातील ५६ टक्के लोक चिंताक्रांत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची प्रचंड भीती

A two-and-a-half-fold increase in depression from lockdown to unlock | लॉकडाऊन ते अनलॉक नैराश्यात अडीचपट वाढ

लॉकडाऊन ते अनलॉक नैराश्यात अडीचपट वाढ

Next

मुंबई : भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च रोजी लागू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात रोजगार, आरोग्य आणि भविष्याच्या चिंतेमुळे सुमारे २१ टक्के लोकांना नैराश्य आले होते. १ जूनपासून अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला असताना त्या नैराश्यात तब्बल अडीचपटीने वाढ झाली आहे. आजच्या घडीला देशातील ५६ टक्के लोकांना नैराश्याने ग्रासले आहे. दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारी आघाडीवर कसोशीने प्रयत्न सुरू असले तरी त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल, असे मत ७९ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.

अनलॉकचा पहिला टप्पा १ जूनपासून सुरू झाला. मुंबई महानगर क्षेत्रातही सोमवारपासून खासगी कार्यालयांना निर्बंधांसह कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही प्रमाणात सार्वजनिक प्रवासी सेवासुद्धा सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे लोकांची रस्त्यांवरील वर्दळ वाढू लागली आहे. परंतु, या काळात लोकांची चिंता आणि नैराश्यात लक्षणीय वाढ झाली आहे. हे निरीक्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वेक्षण करणाऱ्या लोकल सर्कल या देशातील आघाडीच्या संस्थेच्या अहवालातून पुढे आले आहे. असंख्य मुद्द्यांवर विविध समाज घटकांना व्यक्त होण्याची संधी देणाºया या संस्थेचे निरीक्षण अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला सादर केले जातात.
एप्रिल महिन्यात ४२ टक्के लोक मानसिकदृष्ट्या स्थिर आणि शांत होते. ते प्रमाण आता २५ टक्क्यांवर आले आहे. तर, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २६ टक्के लोकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले होते. चार टप्प्यांच्या काटेकोर लॉकडाऊननंतर ते प्रमाण १० टक्क्यांवर आले आहे.
देशातील २११ जिल्ह्यांतल्या १७ हजार लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात सर्व घटकांच्या मतांचा विचार करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली आण चेन्नई येथे रुग्णसंख्या जास्त असल्याने तिथली दहशतही जास्त आहे. मात्र, श्रमिकांच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील प्रादुर्भावही वाढू लागल्याने तिथल्या लोकांच्या चिंतेतही वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.

एप्रिलनंतर वाढले प्रमाण
एप्रिल महिन्यात ४२ टक्के लोक मानसिकदृष्ट्या स्थिर आणि शांत होते. ते प्रमाण आता २५ टक्क्यांवर आले आहे. तर, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २६ टक्के लोकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले होते. चार टप्प्यांच्या काटेकोर लॉकडाऊननंतर ते प्रमाण १० टक्क्यांवर आले आहे.

Web Title: A two-and-a-half-fold increase in depression from lockdown to unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.