लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिहारच्या तरुणाकडून अडीच किलो चरस जप्त करण्यात आला. याची आंतराष्ट्रीय बाजारातील किंमत ५० लाख रुपये आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने गुरुवारी ही कारवाई केली.
नेपाळ येथून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य मुंबईत चरस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कक्ष ५च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने गुरुवारी भांडुप परिसरात सापळा रचून तरुणाला अटक केली. त्याच्याकडून अडीच किलो चरस जप्त केले. अटक करण्यात आलेला तरुण बिहारचा असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मोहिनी लोखंडे, संजय जगताप, गणेश जाधव, यादव आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली.
.........................................