Join us

ई चलानच्या कॉलमुळे अडीच हजार जणांनी भरला सव्वा कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:07 AM

२४ दिवसांत कारवाई, वाहतूक पोलिसांच्या कॉल सेंटरला मुंबईरांचा सकारात्मक प्रतिसादई चलानच्या कॉलमुळे अडीच हजार जणांनी भरला सव्वा कोटीचा ...

२४ दिवसांत कारवाई, वाहतूक पोलिसांच्या कॉल सेंटरला मुंबईरांचा सकारात्मक प्रतिसाद

ई चलानच्या कॉलमुळे अडीच हजार जणांनी भरला सव्वा कोटीचा दंड

२४ दिवसांत कारवाई : वाहतूक पोलिसांच्या कॉल सेंटरला मुंबईकरांचा सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाहतूक पोलिसांनी ई चलान दंड वसुलीसाठी सुरू केलेल्या कॉल सेंटरमुळे १ कोटी १२ लाख २२ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २४ दिवसांत ही कारवाई करण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून ई-चलान आकारण्यात येते. कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम थकीत असल्याचे दिसून आले. यात अनेकांना दंडाच्या रकमेबाबत माहिती नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वाहनावर असलेल्या दंडाच्या रकमेची माहिती मिळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ७ डिसेंबरपासून कॉल सेंटर सुरू केले.

यात, हेल्पडेस्कच्या दोन प्रतिनिधींसह दोन अंमलदार कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या २४ दिवसांत ४ हजार ६०० नागरिकांशी संपर्क साधत दंडाच्या रकमेबाबत माहिती दिली. नागरिकांचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यात २ हजार ५९३ नागरिकांकडून १ कोटी १२ लाख २२ हजार २५० रुपये दंडाची रक्कम शासन दरबारी जमा झाली आहे.

.......................