ओएलएक्सवरून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:01+5:302021-02-11T04:07:01+5:30

अंधेरीतून घेतले ताब्यात ; वर्सोवा पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओएलएक्स ॲपवरून संपर्क साधून जवळपास सात लाखांची ...

Two arrested for cheating on OLX | ओएलएक्सवरून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

ओएलएक्सवरून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Next

अंधेरीतून घेतले ताब्यात; वर्सोवा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ओएलएक्स ॲपवरून संपर्क साधून जवळपास सात लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना वर्साेवा पाेलिसांनी मंगळवारी अंधेरीतून अटक केली.

सलमान मोहम्मद इसरार शेख (वय २८) आणि मोहसीन अहमद जावेद खान (२९) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठगांनी ओएलएक्स ॲपद्वारे संपर्क साधून ९ टीव्ही, ३ वॉशिंग मशीन, ५ होमथिएटर, २ कॅमेरे, ५ मोबाईल, ॲपल वॉच, १० लॅपटॉप, आयपॉड, मॅक प्रो-बुक, साउंड बार या वस्तू कमी किमतीत विकायचे असल्याचे सांगितले. या वस्तू खरेदीची ७ लाख २२ हजार ६१० रुपये एवढी किंमत बँक खात्यावरून ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठविले; मात्र त्यांना वस्तू मिळाल्याच नाहीत.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वर्सोवा पोलिसांकडे ९ ऑगस्ट, २०२१ रोजी तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक मदतीच्या साहाय्याने आरोपीचे मोबाईल लोकेशन मिळवले. त्यानंतर चाैकशीअंती अंधेरी पूर्वच्या रुस्तमजी इमारतीमधून दाेघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पाेलीस त्यांची अधिक चाैकशी करत आहेत.

........................................................

Web Title: Two arrested for cheating on OLX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.