ड्रग्ज तस्करीप्रकरणी अग्निसुरक्षा अधिकाऱ्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:58+5:302021-01-20T04:07:58+5:30
एनसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षच्या पथकाने (एनसीबी) सोमवारी रात्री एका अग्निसुरक्षा अधिकाऱ्यासह ...
एनसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षच्या पथकाने (एनसीबी) सोमवारी रात्री एका अग्निसुरक्षा अधिकाऱ्यासह दोघांना अटक करून त्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले. संदीप गणपत चव्हाण व नझीम खान, अशी अटक आराेपींची नावे आहेत.
दक्षिण मुंबईतील जे.जे. रुग्णालय परिसरात एके ठिकाणी एमडी पावडर विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. झडतीत त्यांच्याकडे ६५ ग्रॅम मेपोडियन पावडर (एमडी) सापडली.
दोघे दक्षिण मुंबई व परळ परिसरात तस्करी करीत होते. चव्हाण हा अग्निसुरक्षा अधिकारी म्हणून एका खासगी एजन्सीकडे काम करीत होता. त्याच्यासह दोघांकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
......................