Join us

दोन कोटी रुपयांच्या सोने चोरीप्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: June 27, 2017 2:22 AM

दोन कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या नोकरासह आणि त्याच्या साथीदाराच्या मुसक्या समतानगर पोलिसांनी सोमवारी आवळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दोन कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी करून फरार झालेल्या नोकरासह आणि त्याच्या साथीदाराच्या मुसक्या समतानगर पोलिसांनी सोमवारी आवळल्या. हे सोने बसमध्ये अनोळखी व्यक्तीने चोरल्याचा बनाव या नोकराने केला होता.मनोहरसिंग आणि नारायणसिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हैदराबाद आणि राजस्थानमध्ये समतानगर पोलिसांची तीन पथके गेले एकवीस दिवस या मनोहरसिंगचा शोध घेत होते. अखेर बोरीवलीमधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चोरीला गेलेले सोने देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. मुंबईच्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने ही तक्रार पोलिसांकडे केली होती. व्यापाऱ्याने २९ मे रोजी दोन कोटींचे कच्चे सोने त्याचा नोकर मनोहरसिंगमार्फत मागविले होते. मात्र कांदिवलीत बसमध्ये शेजारी बसलेल्या प्रवाशाने मला गुंगीचे औषध देऊन ते हापविले, असे नोकराने मालकाला सांगितले. हे प्रकरण काळाचौकी पोलिसांनी दाखल करून घेत नंतर ते ३ जून रोजी समतानगर पोलिसांकडे वर्ग केले होते. हा नोकर देखील फरार झाला होता. तपासाअंती पोलिसांनी नोकरासह त्याच्या साथीदाराला अटक केली.