अवैधरीत्या कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:53+5:302020-12-31T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंडियन सॉफ्ट शेल आणि स्टार प्रजातीच्या कासवांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या दोघांना मुंबईत अटक करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडियन सॉफ्ट शेल आणि स्टार प्रजातीच्या कासवांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या दोघांना मुंबईत अटक करण्यात आली.
शेख मोहम्मद दानिश अब्दुल रहीम (२५) आणि मोहम्मद नदीम जमील अहमद (२३) अशी अटक आराेपींची नावे आहेत. त्यांना अंधेरी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले. दोघेही मालाड येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ४ स्टार प्रजातीचे कासवे व १ इंडियन सॉफ्ट शेल कासव ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील कासवे प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी, मुंबई यांच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी व पुढील देखरेखीसाठी सोपविण्यात आली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
उपवनसंरक्षक, वन्यजीव ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक, फणसाड अभयारण्य यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव मुंबईचे अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय उपनिर्देशक वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रितपणे सापळा रचून ही कारवाई केली.
....................................