मुंबई- दि,६ मे २०२४ रोजी हाँगकाँग (चीन) येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेत आरेच्या हर्षदा गोळे आणि आश्विन सोलंकी यांनी आशियाई पॉवरलिफ्टींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी केली. या दोघांनी सुवर्ण पदक पटकावून या दोघांनी आपल्या भारत देशाचे नाव रोशन केले.या विशाल कामगिरी बद्दल सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षदा गोळे हिला वडील नाही, आईने घरकाम करून मुलीला या खेळात प्रोत्साहन दिले. आरे येथील नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात या मुलीला स्वतः आर्थिक मदत दिली. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यावेळी समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर, उद्योगपती ईश्वर रणशूर, समाजसेवक व ज्येष्ठ वकील जगदीश जायले यांनी केलेली आर्थिक मदत तीने सार्थ केली.
भारतासाठी महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून या दोन खेळाडूंनी आरेचा नावलौकीक वाढवला असे सुनील कुमरे यांनी अभिमानाने सांगितले.