मुंबईतील दोन शैक्षणिक संस्थांच्या प्रयोगशाळा ठरल्या ‘सर्वोत्तम’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:17 AM2019-02-16T02:17:32+5:302019-02-16T02:17:49+5:30

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांना सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 Two of the best educational institutes in Mumbai! | मुंबईतील दोन शैक्षणिक संस्थांच्या प्रयोगशाळा ठरल्या ‘सर्वोत्तम’!

मुंबईतील दोन शैक्षणिक संस्थांच्या प्रयोगशाळा ठरल्या ‘सर्वोत्तम’!

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांना सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांचे पुरस्कार माहिम येथील सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, कांदिवलीतील ठाकूर पॉलिटेक्निक या मुंबईतील शैक्षणिक संस्थांसह ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा एकूण ११ शैक्षणिक संस्थांना घोषित झाले. शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत अभ्यासक्रम तयार करणे व राबविणे त्याचप्रमाणे संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सोईसुविधा, यंत्रसामग्री व मनुष्यबळ यांचा सदुपयोग व दर्जा उंचावण्याकरिता अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे प्रयोगशाळांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट असावी व त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी २०१४-१५ पासून सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार देण्यात येतात. ५० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वोत्तम प्रयोगशाळा निवडण्याकरिता प्राथमिक आॅनलाइन फेरीमध्ये संस्थांकडून अर्ज मागविण्यात येतात. प्राथमिक चाचणीनंतर पुढील फेरीस पात्र संस्थांच्या प्रयोगशाळांना तज्ज्ञ समिती अचानक भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करते. समितीच्या अहवालानुसार अंतिम पात्र संस्थांची निवड होते. पुरस्काराची रक्कम संस्थेकडून त्या प्रयोगशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी वापरण्यात येते.
शुक्रवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आदी उपस्थित होते.

सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कारप्राप्त संस्था, वर्ष तसेच पुरस्कार स्वीकारलेल्या
प्राचार्य / विभागप्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे (ठाणे, नवी मुंबई, मुंबई) :
संस्थेचे नाव शैक्षणिक वर्ष प्राचार्य/विभाग प्रमुखांचे नाव
विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक, ठाणे २०१५-१६ डी. के. नायक, प्राचार्य
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी, नवी मुंबई २०१६-१७ पी. एन. टंडन, प्राचार्य
ठाकूर पॉलिटेक्निक, कांदिवली (पू.), मुंबई २०१६-१७ डॉ. एस. एम. गणेचारी, प्राचार्य
सेंट झेवियर्स पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, माहिम, मुंबई २०१५-१६ एस. बी. घुग्राड, प्राचार्य

Web Title:  Two of the best educational institutes in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.