Join us

घाटकोपरमध्ये आढळले दोन मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:07 AM

पोलिसांकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात गुरुवारी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात गुरुवारी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. यातील एक मृतदेह घरात तर एक खाडीलगत आढळला. राजू बाबर (वय ५०) आणि श्याम गायकवाड (वय ४०) अशी मृतांची नावे असून, या प्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबर आणि गायकवाड रमाबाई कॉलनी परिसरात राहत हाेते. गुरुवारी बाबर हे घरामध्येच मृतावस्थेत आढळले. घटनेची वर्दी मिळताच पंतनगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी राजावाडी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. बाबर आजारी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली आहे.

तर, गायकवाड हे बुधवारपासून बेपत्ता होते. या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत ते हरविल्याप्रकरणी तक्रार दिली होती. शोध सुरू असताना खाडीत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल तेथे दाखल झाले. त्यांनी गायकवाड यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

....................