Join us

दोघा लाचखोरांना अटक

By admin | Published: February 19, 2015 2:46 AM

ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबई युनिटने तब्बल १८ लाखांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ अटक केली.

ठाणे उत्पादक शुल्क : १८ लाख घेताना पकडलेमुंबई : ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबई युनिटने तब्बल १८ लाखांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ अटक केली. ही कारवाई ठाण्यातील, चेंदणी कोळीवाड्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात कारवाई केली. अधीक्षक मनोहर माणिकराव अनचुळ े(४४), निरीक्षक रमेश मारुती धनशेट्टी यांनी उत्पादन शुल्क विभागातील एका उपनिरीक्षकाककडे ही लाच मागितली होती. मात्र उपनिरीक्षकाने या दोघांची तक्रार एसीबीकडे केली. या प्रकरणातील तक्रादार फौजदार राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभागातील भरारी पथकात नेमणुकीस होता. तसेच येत्या काही दिवसांत निरीक्षक पदावर बढती मिळण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच २२ जानेवारीला पकडलेले वाहन सोडण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. या कारवाईमुळे फौजदाराचे निलंबन करणे, अन्यत्र बदली करणे ही खात्यांतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. निलंबन न करता फक्त अन्यत्र बदली करण्यासाठी वरिष्ठांना लाच द्यावी लागेल, असे सांगून अधीक्षक अनचुळे, निरीक्षक धनशेट्टी यांनी या फौजदाराकडे तब्बल १८ लाखांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)