दोन लाचखोरांना २५ मेपर्यंत कोठडी

By admin | Published: May 26, 2016 02:20 AM2016-05-26T02:20:27+5:302016-05-26T02:20:27+5:30

जागेचे मोजपाम व नकाशा तयार करण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा लाचखोरांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी ठाणे ठोठावली आहे.

Two bribe closures till 25 May | दोन लाचखोरांना २५ मेपर्यंत कोठडी

दोन लाचखोरांना २५ मेपर्यंत कोठडी

Next

ठाणे : जागेचे मोजपाम व नकाशा तयार करण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा लाचखोरांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी ठाणे ठोठावली आहे.
ठाणे शहर सर्वेक्षण विभागातील मेंटनन्स सर्व्हेअर रमेश सरकाते (५२) आणि संदीप खांडेकर अशी दोघांची नावे आहेत.
सरकाते यांनी तक्र ारदारांच्या जागेचे मोजमाप व नकाशा
तयार करून देण्यासाठी तीन लाख
रु पयांची मागणी केली होती. त्यातील दीड लाखांचा पहिला
हप्ता सरकाते याच्या वतीने घेताना खांडेकर याला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर सरकाते यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक राजेश बागलकोटे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Two bribe closures till 25 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.