Join us  

दोन लाचखोरांना २५ मेपर्यंत कोठडी

By admin | Published: May 26, 2016 2:20 AM

जागेचे मोजपाम व नकाशा तयार करण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा लाचखोरांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी ठाणे ठोठावली आहे.

ठाणे : जागेचे मोजपाम व नकाशा तयार करण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा लाचखोरांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी ठाणे ठोठावली आहे. ठाणे शहर सर्वेक्षण विभागातील मेंटनन्स सर्व्हेअर रमेश सरकाते (५२) आणि संदीप खांडेकर अशी दोघांची नावे आहेत. सरकाते यांनी तक्र ारदारांच्या जागेचे मोजमाप व नकाशा तयार करून देण्यासाठी तीन लाख रु पयांची मागणी केली होती. त्यातील दीड लाखांचा पहिला हप्ता सरकाते याच्या वतीने घेताना खांडेकर याला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर सरकाते यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक राजेश बागलकोटे यांनी दिली. (प्रतिनिधी)