Join us

एमएमआरडीए बांधणार उल्हास नदीवर दोन पूल

By admin | Published: January 16, 2016 1:49 AM

उल्हास नदीवर दोन पूल बांधण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भिवंडी-कल्याण-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर

मुंबई : उल्हास नदीवर दोन पूल बांधण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भिवंडी-कल्याण-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक तर दुसरा पूल माणकोली-मोटागाव रस्त्यावर दुर्गाडी किल्ल्याजवळ बांधण्यात येणार आहे.राज्याचे मुख्य सचिव आणि प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत ३-३ मार्गिका असणारा एक पूल दुर्गाडी किल्ल्याजवळ बांधण्यात येणार आहे. हा पूल २५ मीटर रुंदीचा आणि ३८0 मीटर लांब आहे. त्याला १७0 व २७0 मीटर लांबीचे पाच मार्ग असतील. तसेच माणकोली-मोटागाव रस्त्यावर बांधण्यात येणारा पूल १ हजार २२५ मीटर लांब २७.५ मीटर रुंद असणार आहे. दोन्ही पुलांच्या कामासाठी ७६ कोटी २२३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)