Join us

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 9:50 AM

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्दे मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

मुंबई- मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जातं आहे.

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती. तसंच  संजय तुर्डे यांनीही आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यावरुन आता परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची चिन्हं आहेत.

शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, किरीट सोमय्यांनी केला होता . त्याबाबतचं पत्र त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना लिहिलं आहे. 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?दरम्यान मनसे सोडून शिवसेनेत गेलेले सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक परतणार असल्याचा दावा मनसेने केला होता. या चार नगरसेवकांनी  पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं  मनसेने म्हटलं होतं.

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच- शिवसेना सहा नगरसेवकांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरु असून आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच आहोत, अशी माहिती देण्यात आली

टॅग्स :मनसेशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरेनगर पालिका