लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीआयने मुंबईतील आयकर विभागाच्या दोन निरीक्षकांना १५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली. दिलीप कुमार आणि आशिष कुमार अशी या दाेन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी दिलीप, आशिष यांच्यासह एस. एन. राय या निरीक्षकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तिघेही आयकर विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन युनिट १ येथे कार्यरत आहेत. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीत मदत करण्याच्या नावाखाली १५ लाखांची लाच मागण्यात आली हाेती. याप्रकरणी तक्रार येताच सीबीआयने सापळा रचून दोघांना प्रत्येकी १० आणि ५ लाख स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यांच्या साथीदारावरही गुन्हा दाखल केला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे मुंबई आणि दिल्लीतील घर तसेच कार्यालयात छापा टाकून ७ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
.......................................