मुंबई : खरीप हंगामातील कापूस लागवडीस ४२ कंपन्यांच्या माध्यमातून बियाणांची दोन कोटी पाकिटे उपलब्ध केली जाणार आहेत. साधारणपणे ४० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचे नियोजन केले असून, यंदा प्रथमच पाच हजार बियाणांचे नमुने पेरणीपूर्व तपासणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे सांगितले.खरीप हंगामाच्या नियोजनासाठी मंत्रालयात कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली. या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यंदा बियाणे कंपन्यांनी त्यांच्या गोदामातून नमुने काढूनच विक्री करण्याच्या शासनाच्या धोरणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
‘खरीप हंगामासाठी कापूस बियाण्यांची दोन कोटी पाकिटे उपलब्ध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:45 AM