महाविद्यालयांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय सुसंवाद कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:30 AM2020-01-05T05:30:42+5:302020-01-05T05:30:46+5:30
सीईटीनंतर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून आता सीईटी सेलने विभागीय स्तरावर कार्यशाळांद्वारे कार्यक्रम आयोजित केला आहे.
मुंबई : सीईटीनंतर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून आता सीईटी सेलने विभागीय स्तरावर कार्यशाळांद्वारे कार्यक्रम आयोजित केला आहे. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर , नाशिक व पुणे या ६ विभागांमध्ये विभागीय सुसंवाद कार्यक्रम (रिजनल इंटरॅक्शन प्रोग्रॅम) आयोजित करण्याचा निर्णय सीईटी सेल आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील कार्यशाळा पार पडल्यानंतर सोमवार, मंगळवार मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांचे प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत. ६, ७ जानेवारी सिडनॅम कॉलेज आॅफ कॉमर्स अँण्ड इकोनॉमिक्स येथे सकाळी १०.३० ते ५. ३० या वेळेत हा कार्यक्रम पार पडेल.
राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी अर्धवट माहितीमुळे तसेच प्रवेश प्रक्रियेतील आॅनलाइन अर्ज भरताना चुकीच्या समुपदेशानामुळे प्रवेशात अडचणी येतात. येणाºया वर्षात चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयांच्या प्रतिनिधींशी सीईटी सेल थेट संपर्क साधून मार्गदर्शन करत आहे. गेले दोन दिवस पुण्यात कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता दुसºया टप्यात तो मुंबईत होणार आहे.