कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 13, 2024 07:04 PM2024-02-13T19:04:53+5:302024-02-13T19:05:20+5:30

शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार दि, १६ व १७ आयोजित केले जाणार आहे.

Two-day statewide convention of Shiv Sena on 16th and 17th February at Kolhapur | कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

मुंबई: शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार दि, १६ व १७ आयोजित केले जाणार आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर जेष्ठ नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात चर्चा होणार आहे.

या राज्यव्यापी महाअधिवेशनाबद्दल माहिती देताना शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर म्हणाले की, २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली काय तयारी आहे, याचे आकलन करण्यासाठी दि,१६ व  १७ फेब्रुवारी रोजी होणारे हे राज्यव्यापी महाअधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. 

तीन सत्रांमध्ये होणाऱ्या या अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत आणि त्यावर विचार विनिमय व  चर्चा केली जाणार आहे व ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील. तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा होईल. 

या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आपण काय तयारी केलेली आहे व आणखी काय तयारी करायला हवी, याबद्दल पक्षाचे जेष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे व नंतर या सत्राचा समारोप होईल. तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील व त्यानंतर या राज्यव्यापी महाअधिवेशनाचा सांगता समारोप होईल. कोल्हापूरच्या करवीर वासिनी अंबाबाई मातेचे दर्शन घेऊन सर्व नेते पदाधिकारी या महाअधिवेशनाला सुरुवात करतील, अशी माहिती त्यांनी दिली.  

Web Title: Two-day statewide convention of Shiv Sena on 16th and 17th February at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.