दोन दिवसात ३४ बस धावल्या पाच हजार कि.मी.; हाती पडले फक्त एक लाख ३६ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:05 AM2021-04-17T04:05:17+5:302021-04-17T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार व रविवार (१० व ११ एप्रिल राेजी) कडक निर्बंध ...

In two days, 34 buses ran 5,000 km; Only one lakh 36 thousand rupees fell into his hands | दोन दिवसात ३४ बस धावल्या पाच हजार कि.मी.; हाती पडले फक्त एक लाख ३६ हजार रुपये

दोन दिवसात ३४ बस धावल्या पाच हजार कि.मी.; हाती पडले फक्त एक लाख ३६ हजार रुपये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार व रविवार (१० व ११ एप्रिल राेजी) कडक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी, हे दोन दिवस प्रवासी संख्या घटली. त्यामुळे परळ बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेसची संख्याही कमी करण्यात आली होती. याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला. या दोन दिवसात ३४ बसेस ५,९१० हजार किमी धावल्या. यातून महामंडळाला केवळ एक लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न झाले.

परळ आगाराला लॉकडाऊनपूर्वी लाख रुपये दररोज उत्पन्न मिळत होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लावले. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली. त्यामुळे आगारातून निम्म्या बस धावू लागल्या. एसटी बसेसची संख्या घटल्याने उत्पन्न घटले. मागील काही दिवसांपासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रविवार व शनिवार कडक निर्बंध असल्याने अनेक प्रवाशांनी बाहेरगावी जाणे टाळले. त्यामुळे प्रवासी संख्या घटली. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही कमी केल्या.

कोरोना प्रादुर्भावामुळे वीकेंड लाॅकडाऊनला एसटी महामंडळाचे नुकसान झाले आहे. त्यातच ‘ब्रेक द चेन’चा मोठा फटका बसला असून, या दोन दिवस गाड्या रिकाम्याच धावल्या. असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

* ११ लाखांचा फटका

परळ आगाराला एका दिवसाला सहा लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळत होते. दोन दिवसांत फेऱ्या घटल्याने दोन दिवसांमध्ये एसटी महामंडळाला ११ लाखांचा तोटा झाला. तर दोन दिवसांत केवळ एक लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

एकूण बसेस ९७

धावलेल्या बसेस ३४

फेऱ्या ४२

किलोमीटर ५,९१०

उत्पन्न १,३६,०००

...........................

Web Title: In two days, 34 buses ran 5,000 km; Only one lakh 36 thousand rupees fell into his hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.