दोन दिवस मुसळधार? हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:29 AM2018-06-06T06:29:22+5:302018-06-06T06:29:22+5:30

मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारसह सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असतानाच आता उत्तर कोकण म्हणजे मुंबई, रायगड आणि ठाणे या भागात ८ आणि ९ जून रोजी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

 Two days hard? Forecasting of Meteorological Department | दोन दिवस मुसळधार? हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

दोन दिवस मुसळधार? हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारसह सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असतानाच आता उत्तर कोकण म्हणजे मुंबई, रायगड आणि ठाणे या भागात ८ आणि ९ जून रोजी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ८ जून रोजी दक्षिण कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ जून रोजी उत्तर कोकण व दक्षिण कोकणात मुसळधार तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२४ तासांत मान्सून राज्यात
कर्नाटकमध्ये पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून येत्या २४ तासांत
तो महाराष्ट्रात दाखल होईल, असा
अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
छत्तीसगढ, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांत येत्या ४८ तासांत मान्सून व्यापण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण सध्या तयार झाले आहे़ त्यामुळे तेथून पुढील चार दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे़

Web Title:  Two days hard? Forecasting of Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.