उद्या, परवा प्रवाशांची परीक्षा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:33 PM2022-08-19T14:33:12+5:302022-08-19T14:33:34+5:30
Megablock : ब्लॉक कालावधीत अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विविध डागडुजीची कामे करण्यासाठी येत्या शनिवारी-रविवारी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.
ब्लॉक कालावधीत अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
अमृतसर- सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस आणि हावडा-सीएसएमटी नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बरवर काय?
- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
- ब्लॉक दरम्यान सीएसएमटी मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरिता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
मेगाब्लॉक कुठून कुठे?
भायखळा ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर
शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
रविवारी सकाळी १२.४० ते संध्याकाळी ०५.४० वाजेपर्यंत
काय होणार?
ब्लॉकदरम्यान रविवारी सीएसएमटी येथून सकाळी ०५.२० वाजता सुटणारी डाऊन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
ठाणे येथून शनिवारी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.