दोन दिवसांत एक हजार चाकरमानी एसटीने पोहोचले कोकणात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:58 AM2020-08-09T04:58:16+5:302020-08-09T04:58:23+5:30
राज्य सरकारकडून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांसाठी विशेष एसटीच्या गाड्या सोडल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे ३ हजार एसटी सज्ज आहेत.
मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था केली आहे. गेल्या दोन दिवसांत ५० बसमधून सुमारे एक हजार चाकरमानी कोकणात सुखरूप पोहोचले आहेत.
राज्य सरकारकडून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांसाठी विशेष एसटीच्या गाड्या सोडल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे ३ हजार एसटी सज्ज आहेत. यात २२ प्रवाशांच्या ग्रुप बुकिंगचा पर्यायही आहे. मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याने काही गाड्या गुरुवारपासून मार्गस्थ झाल्या आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकांतून सुटणाºया बस जिल्हा आणि व तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत थेट धावतील. त्यापुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी स्थानिक आगाराच्या बस उपलब्ध असतील. शनिवारी संध्याकाळपर्यंत ६,६०० लोकांनी कोकणात जाण्यासाठी तिकीट आरक्षित केले. गुरुवारी आणि शुक्रवारी मिळून ६६ बस सोडण्यात आल्या होत्या, तर शनिवारी ५३ बस सोडण्यात आल्या आहेत.
असा करावा लागणार प्रवास
गणेशोत्सवासाठी १२ आॅगस्टपर्यंत जे नागरिक एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनाने कोकणात येतील त्यांना दहा दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. त्यासाठी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही.
१२ आॅगस्टनंतर जे नागरिक कोकणात जातील त्यांच्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य आहे. ती निगेटिव्ह असेल तरच प्रवासाची परवानगी मिळेल.
कोकणात जाणाºया एसटी बसने प्रवास करणाºयांना ई-पासची आवश्यकता नाही.
खासगी वाहनाने कोकणात जाणाºयांना पोलिसांच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. निर्धारित प्रवासी संख्या आणि अन्य अटी-शर्तींचे पालन केल्यानंतरच पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी ई-पास देतील.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया नागरिकांना जिल्हाधिकाºयांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
एसटीने प्रवास करताना कोरोना प्रसार होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण, मास्क याची काळजी प्रवाशांना घ्यावी लागेल.
एसटी महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक विधीसाठी वाहन थांबवले जाईल. प्रवासादरम्यान भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांना करावी लागेल.