मुंबईत दाेन दिवस पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:03 AM2020-12-07T04:03:01+5:302020-12-07T04:03:01+5:30

९, १० डिसेंबरला काही ठिकाणी पुरवठा बंद : काही परिसरांत कमी दाबाने पाणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई ...

Two days water flood in Mumbai | मुंबईत दाेन दिवस पाणीबाणी

मुंबईत दाेन दिवस पाणीबाणी

googlenewsNext

९, १० डिसेंबरला काही ठिकाणी पुरवठा बंद : काही परिसरांत कमी दाबाने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेने ९ व १० डिसेंबर रोजी सुमारे ४ किलोमीटर लांबीची व १,८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे एस विभागात काही परिसरांमध्ये ९ व १० डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहील, तर काही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत डक लाइन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापूर, तुलशेतपाडा, प्रतापनगर, जमिलनगर, समर्थनगर, सुभाषनगर, द्राक्षबाग, उत्कर्षनगर, राजदीपनगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीमनगर, बेस्टनगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाउंड, रामनगर, पासपोली गाव, मोरारजीनगर, गावदेवी टेकडी, सर्वोदयनगर या परिसरांत पाणी येणार नाही.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखाननगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांतिनगर, कबीरनगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी अँड टी वसाहत, ओमनगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक परिसर), सहार गाव, सुतार पाखाडी, विजयनगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कमी दाबाने पाणी येईल.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणी येईल, तर ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कुर्ला उत्तर परिसर, बरेली मशीद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकरनगर, महात्मा फुलेनगर, तानाजीनगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गालगतचा परिसर, सत्य नगर पाइपलाइन येथे कमी दाबाने पाणी येईल. धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेमनगर, नाईकनगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग येथेही कमी दाबाने पाणी येईल.

....................................

Web Title: Two days water flood in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.