जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:11 PM2018-07-06T12:11:02+5:302018-07-06T15:16:51+5:30
मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान पाच जण बुडाल्याची घटना समोर आली होती.
मुंबई : गुरुवारी (6 जुलै) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीदरम्यान पाच जण बुडाल्याची घटना समोर आली होती. यामधील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर यामध्ये तिघांचा बूडून मृत्यू झाला आहे. फरदिन सौदागर, सोहेल शकील खान आणि नझीर गाझी या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शोध घेत आहेत.
Mumbai: Body of one more boy recovered from the sea near Juhu Chowpatti, search operation for rest two underway. Five boys had gone in the waters yesterday evening, one was rescued by lifeguards after the incident while body of one boy was recovered last night
— ANI (@ANI) July 6, 2018
अंधेरी पश्चिम येथील डी. एन, नगरमध्ये डोंगरावर राहणारे फरदिन सौदागर (वय 17), सोहेल शकील खान (वय -17), फैसल शेख (वय 17), नाझीर गाझी (वय - 17) व वसीम सलीम खान (वय - 22) हे तरुण चौपाटीवर पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, समुद्राला भरती असल्याने ते पाचही जण बुडाले. मात्र, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या शोधकार्यानंतर वसीम खान या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर तिघांचे मृतदेह सापडले असून एका तरुणाचा शोध सुरु आहे.