दोन अपघातांत दोघांचा मृत्यू
By Admin | Published: April 19, 2016 03:49 AM2016-04-19T03:49:13+5:302016-04-19T03:49:13+5:30
मुलुंड, वरळी परिसरात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार झाले. त्याचप्रमाणे, तिसऱ्या अपघाताच्या घटनेत सागरी सेतूवर भरधाव वाहनाने धडक दिल्याने वाहतूक पोलीस हवालदार जखमी झाला आहे.
मुंबई : मुलुंड, वरळी परिसरात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार झाले. त्याचप्रमाणे, तिसऱ्या अपघाताच्या घटनेत सागरी सेतूवर भरधाव वाहनाने धडक दिल्याने वाहतूक पोलीस हवालदार जखमी झाला आहे. या अपघातांप्रकरणी मुलुंड आणि वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवारी रात्री १ च्या सुमारास वांद्रे वरळी सागरी सेतूवरून भरधाव वेगाने वरळीच्या दिशेला जाणाऱ्या सुमो कारच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याने आय २० कारला धडक दिली. या धडकेत सुमोमधील अंकित शांताराम फोंडके (२८) चा जागीच मृत्यू झाला, तर आय २० कारमधील विलास
नवले (२३), निखिल धोत्रे (२२), भवन पटेल (२३), अंकित पेडणेकर (२४) हे चौघे जखमी झाले.
सुमो कारमध्ये ७ प्रवासी तर आय
२० मध्ये सहा जण प्रवास करत होते.
या अपघातामुळे मोठ्या
प्रमाणात वाहतूककोंडी झाली
होती.
घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांसह वाहतूक पोलीस तेथे दाखल झाले. वाहतुकीवर नियंत्रण आणत असताना भरधाव कारने वाहतूक पोलीस हवालदार संजय मोरे (३५) यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत, सुमोचालक संदीप नागवेकर (२४) आणि मोरे यांना धडक देणाऱ्या कारचा चालक धीरज संसारेला अटक केली आहे. (प्रतिनिधी)