औरंगाबादमधून दोन विकासकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:24 AM2018-10-25T05:24:20+5:302018-10-25T05:24:29+5:30

औरंगाबाद येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या रकमेचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी विकासक विनोद सुराणा आणि संतोश मुथीयान यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली.

Two developers arrested from Aurangabad | औरंगाबादमधून दोन विकासकांना अटक

औरंगाबादमधून दोन विकासकांना अटक

Next

मुंबई : औरंगाबाद येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या रकमेचा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी विकासक विनोद सुराणा आणि संतोश मुथीयान यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्यावर ४५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मुंबईतील व्यावसायिक राहुल गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गुप्ता हे सध्या दुबईत असतात. औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी परिसरात सुराणा आणि मुथीयान यांचा संयुक्त बांधकाम प्रकल्प सुरु होता. गुप्ता यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, २०११ मध्ये त्यांनी या प्रकल्पात सात कोटींची गुंतवणूक केली. त्याबदल्यात त्यांना १३ कोटी परत मिळणार होते. दोघांनी त्यांना १३ कोटींचे धनादेश तीनवेळा दिले. मात्र २०१६ मध्ये ते धनादेश बाऊन्स झाले. याविरुद्ध त्यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दिली. त्यानुसार २९ मे २०१८ ला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोघांविरुद्ध दोन वेळा अजामिनपात्र वॉरंट काढल्यानंतर ते बेपत्ता झाले.
गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, या व्यतिरिक्त सुराणा आणि मुथीयान यांच्या औरंगाबाद येथील फ्लेमिंगो प्रकल्पातही फ्लॅट मिळवून देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यात एकूण ३२ कोटींची गुंतवणूक केली होती. त्यात ए विंगमध्ये नवव्या मजल्यावर फ्लॅट आणि पूर्ण बी विंग देण्याचा करार होता. मात्र ए विंगचा आठ मजली टॉवर उभा केला आणि बी विंगच्या कामाला सुरुवातही केलेली नाही. या प्रकल्पात दोघांनी ४५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. त्याविरुद्ध त्यांनी जानेवारी २०१७ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु होता.
मात्र दोघेही बेपत्ता असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.
।माहिती मिळताच घेतले ताब्यात
दोघेही बुधवारी औरंगाबादमध्ये असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, दोघांनाही ताब्यात घेऊनत्यांना रात्री उशिरा मुंबईत आणण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांनी सांगितले. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांच्यावर ४५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Web Title: Two developers arrested from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक