मुंबईतील जुहू बीचवर बुडणाऱ्या दोघा जणांना जीवरक्षांनी वाचवले
By मनोहर कुंभेजकर | Published: July 2, 2024 07:15 PM2024-07-02T19:15:18+5:302024-07-02T19:15:51+5:30
Mumbai News: लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतांनाच जुहू बीच वर पाण्यात बुडणाऱ्या दोघा मुलांना वाचवण्यात येथील दृष्टी लाईफसविंग गार्ड कंपनीच्या दोन जीवरक्षकांना यश आले आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतांनाच जुहू बीच वर पाण्यात बुडणाऱ्या दोघा मुलांना वाचवण्यात येथील दृष्टी लाईफसविंग गार्ड कंपनीच्या दोन जीवरक्षकांना यश आले आहे.
जुहू बीच वर रविवार दि, ३० रोजी सकाळी ११ वाजता जुहू बीचवर गोदरेज बिल्डिंगजवळ ५ मुले पाण्यात मजा करत होती. त्यातील दोन जण येथील डिप करंटमध्ये अचानक वाहून गेले.सदर घटना येथील दृष्टी लाईफसविंग गार्ड कंपनीचे जीवरक्षक परेश वसईकर आणि हरेश्वर रघुवीर यांच्या लक्षात आले की ही दोन मुले येथे बुडत आहेत. या दोघा जीवरक्षकांनी लगेच पाण्यात पोहत जात रेस्क्यू ट्यूबने त्यांना पाण्याबाहेर सुखरूप काढले. तर यातील बुडणाऱ्या एका मुलाला अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटत होते. जीवरक्षकांनी रुग्णवाहिका बोलावली,मात्र काही वेळाने त्यांनी त्याला कूपर रुग्णालयात नेले. वेळीच जीवरक्षक देवदूता सारखे धावून आल्याने बुडणाऱ्या या दोघांचे जीव वाचले.
पावसात समुद्र खवळवलेला असल्याने पर्यटकांनी मुंबईतील सहा बीचेस वर पाण्यात पोहायला उतरू नये असे आवाहन दृष्टी लाईफसविंग गार्ड कंपनीच्या जीवरक्षकांनी केले आहे.