मुंबई : मुंबईमध्ये कोकेन आणि एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या दोन ड्रग्ज तस्करांना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एएनसी) वरळी कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. एएनसीने या दोघांजवळून तब्बल २३ लाख ५० हजार रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.
वरळी कक्षाचे पथक १६ जुलैला माहीम परिसरात गस्त घालत असताना त्यांना भागोजी किर मार्गावर एक ड्रग्ज तस्कर संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याजवळ ७ लाख रुपये किमतीचे ७० ग्रॅम एमडी सापडले. त्याच्या चौकशीतून पोलीस पथकाने मालाड पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवर असलेल्या एका इमारतीवर छापेमारी केली. वरळी कक्षाने या कारवाईमध्ये १२ लाख रुपये किमतीचे १२० ग्रॅम एमडी आणि ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम कोकेन जप्त केले.