मुंबई : आग्रीपाडय़ातील छगन मिठा पेट्रोल पंपावर काम करणा:या दोन कर्मचा:यांची मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने हत्या केली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या हत्यांमागील हेतू अद्याप पोलिसांना स्पष्ट झालेला नाही.
नागपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अयुब काशिम अन्सारी (44) आणि मोहम्मद साजीद दाऊदमिया अन्सारी (36) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. काल रात्री नेहमीप्रमाणो हे दोघे पेट्रोलपंपावर झोपले होते. गाढ झोपेत असताना अज्ञात हल्लेखोराने चारचाकी वाहनाच्या अवजड सायलेन्सरने दोघांच्या डोक्यात प्रहार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. यापैकी साजीदचा जागीच मृत्यू झाला. तर नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान अयुबचा मृत्यू झाला. गुन्ह्यात वापर झालेला सायलेन्सर पेट्रोलपंपाला लागून असलेल्या छोटय़ा गॅरेजमधून चोरल्याचे नागपाडा पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.
यापैकी साजीद गेल्या वीस वर्षापासून या पंपावर कार्यरत होता. सकाळी-रात्री नऊनंतर पंपावरील पेट्रोलचे पैसे साजीद गोळा करे आणि सुरक्षितपणो मालकाकडे जमा करे, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यानंतर चहा टपरीची देखरेख करण्यासाठी नेमलेला वॉचमन गायब असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कबीर ऊर्फ लंबू असे त्याचे नाव असून दोनेक दिवसांपूर्वीच टपरीच्या मालकाने त्याला नोकरीवर ठेवले होते. तूर्तास कबीर नागपाडा पोलिसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित आहे. या हत्यांमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा घडला ही शक्यता नाकारता येत नाही, असे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार मेहतर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आसपासच्या सीसीटीव्ही कॅमे:यात आरोपी कैद झाला आहे. मात्र चित्रण अस्पष्ट असल्याने आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, असे नागपाडा पोलिसांनी सांगितले.