कोरोनाशी दोन हात हे एक युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:30+5:302021-05-10T04:06:30+5:30

महापालिकेचे आवाहन; दुसरी लाट थाेपवण्यासाठी विविध उपाययाेजनांची अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाशी मुंबई महापालिका ...

Two hands with Corona is a battle; Mumbaikars, cooperate | कोरोनाशी दोन हात हे एक युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा

कोरोनाशी दोन हात हे एक युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा

googlenewsNext

महापालिकेचे आवाहन; दुसरी लाट थाेपवण्यासाठी विविध उपाययाेजनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाशी मुंबई महापालिका करत असलेले दोन हात हे एक युद्धच आहे. या प्रयत्नांमध्ये सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने मुंबईकरांना केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून विविध उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याला यश येत असून काेराेनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी, ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध याचा सकारात्मक परिणाम मुंबईमध्ये दिसत आहे.

जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे सरासरी प्रमाण ०.७१ टक्के इतके आहे. या कालावधीतील काेराेनात इतर झालेले मृत्यू एकत्र केले तरी हे प्रमाण ०.९८ टक्के इतके म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्य:स्थितीत जागतिक काेराेना मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के इतके तर भारतात ते १.१२ टक्के इतके आहे. म्हणजेच, मुंबईतील काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

* चाचण्यांची संख्या वाढतेय

काेराेना रुग्णांचे लवकर निदान करून त्यांना तत्काळ उपचार मिळावेत तसेच त्याद्वारे संसर्ग राेखता यावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून जास्तीतजास्त काेराेना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

* अशा झाल्या काेराेना चाचण्या

जानेवारी - ४ लाख ४४ हजार ७८३

फेब्रुवारी - ४ लाख ७६ हजार २५४

मार्च - ८ लाख ३८ हजार २१०

एप्रिल - १३ लाख ३१ हजार ६९७

मे २०२० ते ७ मे २०२१ - ५९ लाख १८ हजार ८१५

----------------------------

एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्या व आढळून आलेले काेराेनाबाधित (टक्केवारीत)

डिसेंबर २०२० - ५०.३६ - ७.१२

जानेवारी २०२१ - ६५.३१ - ५.३९

फेब्रुवारी २०२१ - ७४.२३ - ५.३३

मार्च २०२१ - ६७.२४ - १५.४८

एप्रिल २०२१ - ६७.८७ - २३.४३

----------------------------

Web Title: Two hands with Corona is a battle; Mumbaikars, cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.