मुंब्य्रातील दोन घरांनी कर्ता आधार गमावला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:09 AM2017-10-01T01:09:14+5:302017-10-01T01:09:25+5:30

शुक्रवारी सकाळी परळ रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्य्रातील दोन तरु णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबाचा प्रमुख आधार तुटल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Two houses in Mumbra lost the support of the family, the sad mountain on the family | मुंब्य्रातील दोन घरांनी कर्ता आधार गमावला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

मुंब्य्रातील दोन घरांनी कर्ता आधार गमावला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

googlenewsNext

- कुमार बडदे ।

मुंब्रा : शुक्रवारी सकाळी परळ रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्य्रातील दोन तरु णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबाचा प्रमुख आधार तुटल्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ठाकूरपाडा परिसरातील संजरी इमारतीच्या पहिल्या माळ्यावर राहणारा ज्योतिबा चव्हाण हा २९ वर्षांचा तरु ण, त्याच्या आई-वडिलांचा एकमेव आधार होता. नवी मुंबईतील बेलापूर येथील एका शिंपिंग कंपनीसाठी काम करीत असलेला ज्योतिबा, कंपनीच्या कामानिमित्त पहिल्यांदा मुंबईला गेला होता, पण त्याची ही पहिली मुंबईवारी त्याच्यासाठी अंतिम ठरली. तीन दिवसांपूर्वी बुधवारी त्याच्या तीन वर्षांच्या मुलीचा वाढदिवस त्याने उत्साहात साजरा केला होता. त्याला दोन महिन्यांचा मुलगाही आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील माव्हंशी गावी शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर रेल्वे स्थानकाजवळील संतोषनगर भागातील तृप्ती अपार्टमेंन्ट मध्ये राहणाºया मोहम्मद शकील या तरुणाचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. तो एल्फिन्स्टन येथील बोहरा चाळीतील एका गारमेंट कंपनीत टेलरचे काम करत होता. तो आणि त्याचे मित्र मुंबईला जाण्यासाठी मुंब्रा स्थानकावरून बहुतांशी वेळा सकाळी ९.४०ची लोकल पकडतात, परंतु शुक्र वारी तो लवकर उठला होता. यामुळे त्याने ९.२१ची लोकल पकडली आणि वीस मिनिटे आधी घटनास्थळावर पोहोचल्यामुळे त्याचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती, त्याचा भाऊ मोहम्मद सादिक याने दिली. त्याच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई-वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. येथील अमृतनगर भागातील कब्रस्तानमध्ये शुक्र वारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह दफन करण्यात आला, तर शकीलचे गोवंडीत राहाणारे मामा मसूर आलम यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला.

Web Title: Two houses in Mumbra lost the support of the family, the sad mountain on the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.