Join us

मुलुंडमध्ये आत्महत्येच्या दोन घटना....ईस्टर्न...२ बातम्या

By admin | Published: August 21, 2014 11:53 PM

मुलुंडमध्ये आत्महत्येच्या दोन घटना

मुलुंडमध्ये आत्महत्येच्या दोन घटना
मुलुंड: दोन ४० वर्षीय इसमांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटना मुलुंडमध्ये समोर आल्या आहेत. अजय कदम (४०) आणि राज चमनलाल चव्हाण (४०) अशी मृत इसमांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज चव्हाण हे मूळचे आंध्रप्रदेश येथे राहणारे असून पत्नीशी पटत नसल्याने ते चार वर्षांपासून मुंबईत आले होते. मुंबईत ते वरळी परिसरात राहत होते. तसेच एका गारमेन्ट कंपनीत काम करत होते. सकाळी ९ च्या सुमारास त्यांचा मृतदेह भांडुप सोनापूर येथील एका झाडाला नायलॉच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. चव्हाण यांच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नये, असे सुसाईड नोटमध्ये नमूद केलेले असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले. चव्हाणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रु ग्णालयात पाठविण्यात आला आहे.
तर दुसर्‍या घटनेत मुलुंड नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अजय कदम (४०) या इसमानेही राहत्या घराच्या पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम हे भाऊ आणि भावजई यांच्यासोबत मुलुंड पूर्वेतील एकता को.ऑप.सोसायटीत राहण्यास होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घराच्या पोटमाळ्यावर दहीहंडीच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. कदम यांना मुलुंडच्या सावरकर रु ग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रु ग्णालयात हलविण्यात आला. सुसाईड नोटमध्ये मृत्यूस कुणालाही जबाबदार धरु नये, असे नमूद करण्यात आल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.
...............................................................
मुलुंडमध्ये तरु णाचा संशयास्पद मृत्यू
मुलुंड: मुलुंडमध्ये तीन दिवसांपासून हरवलेल्या तरु णाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. नवनाथ गुरु नाथ मर्ले (२४) असे या तरु णाचे नाव आहे. नवनाथ आईसोबत मुलुंड योगीहिल येथील घाटिपाडा परिसरात राहण्यास होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दहीहंडी बघण्यासाठी बाहेर जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीर होऊनही तो घरी न परतल्याने मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोध घेत असताना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. नवनाथची हत्या की आत्महत्या याचा शोध आता मुलुंड पोलिस घेत आहेत. नवनाथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजवाडी रु ग्णालयात हलविण्यात आला आहे. गेल्या वर्षी नवनाथचा भाऊ दशरथ मर्लेचाही पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करावी, अशी मागणी नवनाथच्या कुटुंबियांनी केली आहे.
...........................................................