Join us

दोन वेतनवाढ देणारी योजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:41 AM

मराठी भाषा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी घेणाºया कर्मचाºयांची संख्या वाढू लागल्याने, दोन वेतनवाढ देण्याची योजनाच गुंडाळण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. जुलै २०१५पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण

मुंबई : मराठी भाषा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी घेणाºया कर्मचाºयांची संख्या वाढू लागल्याने, दोन वेतनवाढ देण्याची योजनाच गुंडाळण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. जुलै २०१५पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाºयांनाच या योजनेचा लाभ उठविता येणार आहे. मात्र, ही योजना बंद करण्याआधी किमान २०१५-१६ मध्ये खातेप्रमुखांची परवानगी घेऊन किंवा थेट प्रवेश घेऊन, पदव्युत्तर पदवी परीक्षा दिलेल्या कर्मचाºयांना याचा फायदा मिळवून देण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.महापालिकेचे कामकाज हे १०० टक्के मराठीतून चालते. मराठीतून एम. ए. करण्यासाठी कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने ही योजना आणली. त्यानुसार, मराठी भाषेतून एम.ए. करणाºया कर्मचाºयांना दोन वेतनवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार, ही योजना सुरू होऊन, कर्मचाºयांचा यास उत्तम प्रतिसाद मिळू लागला. परिणामी, पालिकेच्या तिजोरीवर ताण वाढला.त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे कारण पुढे करत, प्रशासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.परिपत्रकाला विरोधयोजना बंद करण्याबाबत प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाला विरोध होत आहे. हे परिपत्रक काढण्यापूर्वी एम.ए.साठी प्रवेश घेणाºया कर्मचाºयांनाही याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजपाचे मकरंद नार्वेकर यांंनी केली. त्यावर प्रशासनाच्या वतीने अभिप्राय देऊन, जुलै २०१५पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारीच या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. तरीही २०१५-१६ मध्ये खातेप्रमुखांच्या परवानगीने एम. ए.साठी प्रवेश घेणाºया कर्मचाºयांना याचा लाभ मिळावा, अशी उपसूचना शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीपुढे मांडली आहे.