मुंबई: अणुशक्ती नगर परिसरात पोलिसांनी शस्त्रे असलेली गाडी पकडली असून चिताकॅम्प परिसरात काही घटना घडणार असल्याचा संदेश ट्रॉम्बे परिसरातील एका क्रिकेट सीसी ग्रुपवर एका व्यक्तीने पाठवला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तपासात हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर येताच ट्रॉम्बे पोलिसांनी व्हॉट्स ॲप व इन्स्टाग्रामवर खोटा संदेश व व्हिडीओ पाठवून अफवा पसरवल्याप्रकरणी गुरुवारी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी इरफान इब्राहिम शेख (३०) आणि विजय सांडगे (४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. शेख हा ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प, तर सांडगे अमर नगर येथील रहिवासी आहे. अणुशक्ती नगर परिसरात पोलिसांनी शस्त्रे असलेली गाडी पकडली असून चिताकॅम्प परिसरात काही घटना घडणार असल्याचा संदेश ट्रॉम्बे परिसरातील एका क्रिकेट सीसी ग्रुपवर एका व्यक्तीने पाठवला होता. याबाबत पोलिसांना कॉल येताच त्यांनी तपासणी केली. त्यावेळी ही माहिती खोटी असून एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर एका व्यक्तीने पाठवल्याचा फोटो पोलिसांच्या हाती लागला. तसेच इन्स्टाग्रामवरही अशा प्रकारचे मेसेज आणि एक व्हिडीओही पोलिसांना मिळाला. त्यानुसार, पोलिसांनी दोघांविरुद्ध अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. व्हिडीओ पाठवणाऱ्या इरफान शेख(३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आरोपी विजय पांडूरंग सांडगे(४२) याने दिलेल्या माहितीच्या आधारे शेखने संबंधीत व्हिडिओ तयार केल्याचे सांगितले. त्यानंतर सांडगेलाही पोलिसांनी ताब्यात घेत की एरवी केली आहे. शेख हा ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प, तर सांडगे अमर नगर येथील रहिवासी आहे. अफवा पसरवू नका अन्यथा...सोशल मीडियावर अफवा पसरेल, अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट,फोटो व व्हिडीओ अपलोड करू नये. दक्ष नागरिकांनी अशा पोस्ट पाहिल्यास पोलिसांना तात्काळ याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन उपायुक्त(परिमंडळ-६) हेमराजसिंह राजपूत यांच्याकडून करण्यात आले. तसेच अशा पोस्ट, पोस्ट,फोटो व व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही राजपूत यांनी सांगितले आहे.