कांदिवलीच्या जीन्स फॅक्टरीमधील आगीत चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:35 AM2018-12-24T11:35:21+5:302018-12-24T12:11:38+5:30
कांदिवली पूर्वेकडील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (23 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : कांदिवली पूर्वेकडील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (23 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना चार जणांचे मृतदेह सापडले.
रविवारी गोदामांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांच्या प्रयत्नानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यास जवानांना यश आले होते. मात्र ही आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. राजू विश्वकर्मा (30), राजेश विश्वकर्मा (36), भावेश पारेख (51), सुदामा लल्लनसिंग (36) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. हे चार ही जण गोदामात काम करणारे कर्मचारी असून काम करताना अचानक आग लागल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai: Level-2 fire breaks out in a cloth factory at Damu Nagar near MIDC bus stop in Kandivali (East). Four fire tenders present at the spot. #Maharashtrapic.twitter.com/O2wow42eLz
— ANI (@ANI) December 23, 2018